Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

मी जास्त बोलत नाही पण पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप (BJP) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपेच पाच अधिकृत उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर काँग्रेसने (Congress) आपला उमेदवार मागे घेतलेला नाही. यामुळे आता निवडणूक होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली होती. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही.

आता पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. मी फार जास्त बोलत नसतो. मला विश्वास आहे, आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली, त्यामुळे आम्ही सहावी जागा न लढवण्याचा निर्णय घेतला.

त्याच बरोब यावेळी फडणवीस यांनी ओबीसी (OBC) राजकीय आरक्षणावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी जो सर्वो करणे चालू आहे त्यामध्ये अनेक चुका आहेत. ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. आजच सरकारला मी जागे करु इच्छितो, ओबीसींच्या संख्येपेक्षा कमी संख्या सर्वोमध्ये दाखवली जात आहे. जिल्ह्याचा सर्वे योग्य आहे का नाही, हे पाहिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसी समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारने कार्यवाही करावी, कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. छगन भुजबळ काम करत आहेत. मात्र, या ओबीसी डेटामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT