Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

मला साक्षीदार नाहीतर सहआरोपी बनविण्याचा प्रयत्न ; घोटाळे बाहेर काढणारच!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबईतील BKC पोलिसांनी हजर राहण्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट नुसार नोटीस बजावली होती. या नोटीसीनंतर आज सकाळी ११ वाजता पोलिस ठाण्याला फडणवीस हजर राहणार होते. पण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात न बोलविता त्यांच्या बंगल्यावर त्यांची चैाकशी केली.

फडणवीस यांच्या समर्थनात भाजपकडून (BJP) शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी फडणवीस यांना सांगितले की तुम्ही पोलिस स्टेशनला येवू नका, आम्हीच तुमच्या घरी येतो, असे सांगितले होते. आज सकाळपासून फडणवीस यांची सुमारे दोन तास चैाकशी करण्यात आली.

चैाकशीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, ''राज्य सरकारने पोलिस बदल्याचा महाघोटाळा केला, मी तो बाहेर काढला नसता तर कोट्यावधीचा हा घोटाळा दाबला गेला असता. बदल्यांचा हा अहवाल ठाकरे सरकारने सहा महिने दाबून ठेवला. मला आरोपी बनविता येईल अशा स्वरुपाचे प्रश्न आज मला विचारण्यात आले. न्यायालयाने मान्य केलेला हा घोटाळा आहे. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, मला सहआरोपी बनविता येईल का, असे प्रश्न पोलिसांनी मला विचारले. गोपनीय कायद्याचे उल्लघंन केल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले,''

''मला कितीही गोवण्याचा प्रयन केला तरी मी थांबणार नाही मी घोटाळे बाहेर काढणारच, सरकारला यातून काही हाती लागणार नाही. त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत,'' असे फडणवीस म्हणाले. ''ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्याला नक्कीच असे वाटेल की अशी नोटीस देणे योग्य नाही,'' असे ते म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''संजय राऊत चैाकशीला का घाबरतात, ते का पत्रकार परिषद घेतात, मी घाबरत नाही. राऊत तपास यंत्रणांवर आरोप करतात. मला का बोलावता, मला का बोलावता, असे का म्हणतात,''

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले. यानंतर तब्बल दोन तासानंतर हे पथक बंगल्याबाहेर पडलं आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर गर्दी केली होती.

विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर, नरेंद्र पाटील, मनोज कोटक आदी भाजप नेत्यांनी आज सकाळपासून फडणवीस यांच्या 'सागर'बंगल्याबाहेर गर्दी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT