Pravin Chavan, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

फडणवीसांच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर चव्हाण म्हणाले,'' व्हिडीओतील फेरफार बाहेर येईल''

सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही", असे प्रवीण चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (८ मार्च) विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल,'' असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले आहेत.

'एक कथा : महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना,' असे टायटलखाली फडणवीसांनी विधानसभेत विशेष सरकारी वकिलांचे व्हिडिओचे संभाषण असलेला एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे. त्यात अनेक विषयांवर चव्हाण यांनी भाष्य केल्याचे व्हिडीओमधून दिसून येत आहे. याबाबत चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"या प्रकरणात काहीच तथ्य नाही. या प्रकरणात चौकशी झाली तरी माझी काही हरकत नाही. अनिल गोटेंची एक केस पुण्यात सुरू आहे. त्यासाठी त्यांना सल्ला हवा होता. पण माझ्याकडे वेळ नसल्याचं मी त्यांना सांगितलं. अनिल देशमुखांना सुद्धा कधीच भेटलेलो नाही", असं चव्हाण म्हणाले.

"माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा राजकारणी किंवा त्यांच्या जवळचा नाही. राजकारणामध्ये सुद्धा नाही. माझ्या पूर्ण कार्यकाळ ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार-खासदार या कोणत्याही निवडणुकांमध्ये मी नाही. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही", असे प्रवीण चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"मी अजून व्हीडिओ पाहिलेला नाही. मी त्यातील ऑडिओ अद्याप ऐकलेले नाहीत. सीबीआयची चौकशी किंवा कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही. चौकशी कोणती करायची हे सरकार ठरवणार, हे सर्व टेम्परिंग आहे किंवा जो काही आवाज वगैरे आहे ते आज नाही तर उद्या बाहेर येणारच,'' असे चव्हाण म्हणाले.

"या प्रकरणात काहीच तथ्य नाही. या प्रकरणात चौकशी झाली तरी माझी काही हरकत नाही. अनिल गोटेंची एक केस पुण्यात सुरू आहे. त्यासाठी त्यांना सल्ला हवा होता. पण माझ्याकडे वेळ नसल्याचं मी त्यांना सांगितलं. अनिल देशमुखांनासुद्धा कधीच भेटलेलो नाही", असं चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT