Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnma
मुंबई

Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरे आले तर युती करणार का? फडणवीसांचे थेट उत्तर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंबद्दल देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Latest News : बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत आले आणि मुख्यमंत्री झाले. मग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले तर युती करणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनीही थेट उत्तर दिले आहे. यावरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे आमच्यासोबत येण्याची कोणतीही शक्यता नाही. उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी त्यांची दारे बंद केली आहेत. राजकारणात तुमचा आणि माझा पॉलिटिकल अजेंडा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो. मात्र उद्धव ठाकरेंनी आमची मने दुखावली आहेत, असे Devendra Fadnavis म्हणाले.

ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा व्यवहार राहिला आहे. ते पीएम मोदींवर टीका करतात. खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. यामुळे मने दुखावली गेली आहेत. जिथे मने दुखावतात तिथे युती होऊ शकत नाही. वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्रित येऊ शकतात.

पण मने दुखावल्यानंतर एकत्र येणे कठीण असते. आमची मने दुरावलेली आहेत. यात काही शंका नाही, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंशी युती होऊ शकत नाही, हे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माझ्या सोबत होते. माझी कामे राज्याच्या विकासासाठी असतात. आमच्यामध्ये चांगली अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असेल भाजप की आणखी कोणाचा? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वरील उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT