eknath shinde, devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Mahayuti Politics : महायुतीचा मुख्यमंत्री ठरला पण ज्या खात्यांसाठी CM शिंदे नाराज आहेत त्याबाबतचा निर्णय काय?

Mahayuti Government Formation : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 01 Dec : अखेर महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Devendra Fadnavis CM Of Maharashtra) म्हणून 5 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महायुतीचा (Mahayuti) मुख्यमंत्री कोण हे ठरलं असलं तरी अद्याप उपमुख्यमंत्री म्हणून नेमकं कोण कोण शपथ घेणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शिवाय शिंदेंच्या शिवसेनेने ज्या खात्यांवर दावा केला आहे.

ती खाती भाजप (BJP) त्यांना देणार का? हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. तर भाजप व शिंदेंची शिवेसेना गृह खात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी त्यांचा गृहमंत्रिपदावर दावा कायम आहे. कारण तशी वक्तव्य त्यांच्याच आमदारांकडून केली जात आहेत.

"गृहखाते कणखर नेत्याला मिळायला हवे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. आता मुख्यमंत्रिपद भाजपकडे आहे त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद असलेल्या पक्षाकडे गृहखाते असावं," असं आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.

शिरसाट यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, "कोणत्याही खात्याबाबत माध्यमांमध्ये बोलून काहीही होत नाही, त्यासाठी तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील." असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटपं कसं होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, महायुचीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं बावनकुळेंनी जाहीर केलं आहे. मात्र, त्याआधी भाजपच्या आमदारांची विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठीची बैठक 3 डिसेंबरला होणार आहे. तर या बैठकीत फडणवीसांचीच नेतेपदी निवड होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

एकीकडे सत्ता स्थापनेचा मुहूर्त जाहीर झाला असला तरी नाराज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्याती मुळ गावी गेले आहेत. गावाकडे असतानाच त्यांची तब्येत बिघडली आहे. शिवाय त्यांनी कोणालाही भेटण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे आता नाराज शिंदे नेमका काय निर्णय घेणार? आणि शपथविधी अवघ्या चार दिवसांवर अशताना त्यांची मनधरणी करण्यात भाजपला यश येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT