Devendra Fadnavis | Prasad Lad
Devendra Fadnavis | Prasad Lad Sarkarnama
मुंबई

फडणवीसांचा पुन्हा चमत्कार : 'मविआ'ची २० मत फोडत प्रसाद लाड महाडिकांच्या मार्गावर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीतही पुनरावृत्ती करत अशक्य असलेला पाचव्या जागेवरील विजयही खेचून आणला आहे. महाविकास आघाडीची तब्बल २० मत फोडत भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाडही विजयी झाले आहेत. लाड यांना पहिल्या फेरीत १७ मत मिळाली. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या पहिल्या फेरीतील १२ मत लाड यांना ट्रान्सफर झाल्याने लाड दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत.

भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांमध्ये श्रीकांत भारतीय यांना ३०, राम शिंदे यांना ३०, प्रविण दरेकर यांना २९ तर उमा खापरे यांना २७ मत मिळाली. विजयाच्या २६ मतांचा कोटा वगळून यातील उर्वरित १२ मत दुसऱ्या फेरीत लाड यांना ट्रान्सफर झाली आणि त्यांनी २६ मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करत विजय मिळवला. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी मतमोजणीपूर्वी केलेला दावा खरा ठरवत भाजपचे पाचही उमेदवार विजयी ठरवले आहेत.

पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. काँग्रेसची मत फुटल्याने त्यांचा अद्याप एकही उमेदवार विजयी होवू शकलेला नाही.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली आहेत. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.

पहिल्या फेरीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मत मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची किमान ३ मत फुटली आहेत. याशिवाय त्यांना बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष यांचीही मत मिळाली नसण्याची शक्यता आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT