CM Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : क्लीप द्या, ‘त्या’ मंत्र्यांचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो; विधानसभेत CM फडणवीसांचा गर्भित इशारा, मंत्र्यांची धडधड वाढली...

Devendra Fadnavis Assembly Statement : युवा प्रशिक्षण जेव्हा घोषित केले होते, त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले होते की, हे ११ महिन्यांचे प्रशिक्षण असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Rajanand More

Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी युवा प्रशिक्षण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच या प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही केला जात होता. याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले.

युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती. त्याचा प्रचार ‘लाडका भाऊ योजना’ असा निवडणुकीदरम्यान करण्यात आला होता. त्यावरूनच आता विरोधक आक्रमक झाले आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, युवा प्रशिक्षण जेव्हा घोषित केले होते, त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले होते की, हे ११ महिन्यांचे प्रशिक्षण असेल.

तरूण नोकरी मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तुमच्याकडे काय अनुभव आहे, हे विचारले जाते. अनुभव नसल्याने त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून लाखभर तरूणांना आपण विविध विभागांमध्ये ११ महिने काम दिले आणि त्याचे सर्टिफिकेटही दिले की त्यांनी हे काम केलंय. त्यामुळे कुठेही नोकरीसाठी गेल्यानंतर त्यांनी राज्य सरकारमध्ये काम केल्याचे सर्टिफिकेट असेल, असे फडणवीसांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी क्लिअरकट सांगितले होते की, कुणाला मागील दाराने एन्ट्री देता येणार नाही. त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडे नोकरी शोधावी लागेल. त्यामध्ये कुठलाही संभ्रम असू नये, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरी त्याआधारे सरकारी नोकरी मागता येणार नाही.  

फडणवीस यांनी विधानसभेत भास्कर जाधव यांचा उल्लेख केला. भास्कर जाधव यांनी त्यांनी संबंधित मंत्र्यांची क्लिप माझ्याकडे द्यावी. ज्या मंत्र्यांनी या तरूणांना कायमस्वरूपी नोकरी देतो, असे म्हटले असेल त्यांचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवितो, असा गर्भित इशारा यावेळी फडणवीसांनी संबंधित मंत्र्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT