Dhananjay Mahadik  Sarkarnama
मुंबई

''...पण तुम्हाला देशात कुठंही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं, हे लक्षात ठेवा!''

Dhananjay Mahadik : ...तर महाराष्ट्र शांत बसणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Mahadik : '' तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हांलाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर तुमच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव ठेवा'' असा गर्भित इशारा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कर्नाटकातील आंदोलनकर्त्यांना दिला आहे.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील सीमावादाचा मुद्दा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच यात केंद्राने हस्तक्षेप करत मार्ग काढावा अशी देखील मागणी केली जात आहे. यावर आता राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केलं आहे.

महाडिक म्हणाले, मी कोल्हापुरात स्थायिक असून माझ्यापासून १० किमी अंतरावर कर्नाटक हद्द सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. पण काल महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीचा मी जाहीर निषेध करत आहे. हा वाद न्यायालयात प्रलंबित असताना रस्त्यांवरची दादागिरी, गुंडगिरी हे त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना शोभणारी नाही.

याचवेळी तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हालाही देशात कुठंही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर तोडगा निघाला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT