Dhananjay Munde-Dilip Walse Patil Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंना भेटून आलेले वळसे पाटील म्हणाले, ‘त्यांची प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही; पण डिस्चार्जसंदर्भात...’

दवाखान्यातून डिस्चार्ज कधी मिळतो, याबाबत मला माहिती नाही.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. पण, त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज कधी मिळतो, याबाबत मला माहिती नाही. डॉक्टरच त्यासंदर्भात बोलू शकतात, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले. (Dhananjay Munde's health is very good; No reason to worry : Dilip Walse Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला ३ जानेवारी रोजी अपघात झाला हेाता. त्यात त्यांच्या दोन्ही बरगड्याला मार बसला होता, त्यामुळे मुंडे यांना परळीहून मुंबईला हलविण्यात आले आहे. सध्या मुंडे यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांना भेटून आल्यानंतर वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. काळजी करण्याचे काही एक कारण नाही. विशेष फ्रॅक्चर वगैरे काही झालेली नाही. धनंजय मुंडे यांची तब्येत सध्या चांगली आहे. मी त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, ते चांगलं बोलत आहे.

धनंजय मुंडे यांच्या बरगड्याला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण, माझी डॉक्टरांशी भेट झालेली नाही, त्यामुळे मेडिकल टर्म्ससंदर्भात मी काही सांगू शकणार नाही. पण, अशा अपघातांमध्ये आपल्या रिप्सला थोडा फार धक्का बसतोच. मी त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, ते सध्या चांगलं बोलत आहेत. पण मुंडे यांना हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळणार आहे, हे माझे डॉक्टरांशी बोलणं न झाल्यामुळे मला माहिती नाही. त्यासंदर्भात डॉक्टरच बोलू शकतात, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT