Pankaja Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde, Dhananjay Munde sarkarnama
मुंबई

धनंजय मुंडे भाग्यवान, असे पंकजा का म्हणाल्या?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कार्यक्रम डोळ्यांशी संबंधित असल्यामुळे दृष्टीला अर्थात लेन्सेसला महत्व आहे. मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठे करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून पाहण्याचे भाग्य फार कमी लोकांना लाभले. त्यापैकी एक धनजंय मुंडे (Dhananjay Munde) आहेत, असे पंकजा यांनी म्हटले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर देत पंकजा यांना थेट महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली. "कधीकधी पवारांच्या लेन्समधून बघणेही गरजेचे असते, असे मुंडे म्हणाले.

नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत पार पडला. यावेळी बीडच्या राजकारणातील प्रतिस्पर्धी असलेले मुंडे भावाबहिणीत शाब्दिक जुगलबंदी रंगली. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते व राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पर्यचन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), क्रिडा मंत्री सुनील केदार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

धनंजय मुंडे म्हणाले, कधी तरी ताई अशा लेन्ससच्या फोकसमध्ये आपल्याला यावे लागते. आम्ही आणि आदित्य ठाकरे बोलत बसलो होते. ते म्हणाले कदाचीत ताईंनी लेन्स बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बर होईल. असे ते म्हणत होते, मी नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीची ऑफर दिली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात बीडच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मुंडे आणि लहाने यांच्या परिवारामधील संबंध अधोरेखित केला. बीड जिल्ह्याला डॉक्टर तात्याराव लहाने यांचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढच्या १० पिढ्यांनाही तो तसाच अभिमान राहील. मात्र, या नेत्र चिकित्सालयात सगळेच उपचार मोफत करू नका. तुमचेही कुटुंब आहे. थोडीशी व्यावहारिकता दाखवली पाहिजे. मी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो. मला व्यवहारिकता जमत नाही. हे आमच्या ताईला चांगले माहिती आहे, असेही मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT