Mumbai Municipal Corporation Latest News : धारावी पुनर्विकास प्रकल्प गौतम अदानींच्या कंपनीला दिल्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत मोर्चा काढला होता. धारावी ते अदानी कंपनीच्या बीकेसीतील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 16 डिसेंबरला हा मोर्चा काढला होता. आता धारावीवरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. याचे कारण आहे मुंबई महापालिकेचे एक पत्र...
मुंबई महापालिकेने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. वांद्रे येथील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेने या पत्रातून केली आहे. यामुळे अनधिकृत झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यावरून वांद्रे भागात तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
धारावी पुनर्विकासाची घोषणा झाल्यानंतर वांद्रेमध्ये अनेक बांधकामे सुरू झाली आहेत. ही बांधकामे अनधिकृत आहेत. या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, असे पत्र मुंबई महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय म्हटलंय महापालिकेच्या पत्रात?
- 1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपडी धाराकांना 305 चौरस फुटाचे घर मिळणार
- 2002 ते 2011 पर्यंत इथे उभारण्यात आलेल्या घरांना बाजारभावानुसार स्वतः पैसे भरून घर मिळवता येईल
- पण 2011 नंतरची सर्व घरे अनधिकृत आहेत. त्यावर तोडक कारवाई करावी, असे पत्र मुंबई महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
मुंबई महापालिकेच्या या पत्रानंतर प्रशासनाने तयारी सुरू केल आहे. धारावी झोपडपट्टीत भरारी पथक नेमून या सर्व परिसराची पाहण्यी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामुळेच धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण याला राजकीय विरोध होणार, हे जवळपास निश्चित आहे. कारण धारावीतील नागरिकांना प्रत्ये 500 चौरस फुटाचे घर मिळावे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.