Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

INDIA Bloc News : इंडिया आघाडीतही मतभिन्नता, विधानसभेला तेवढं सोपं नाही; पवारांचे मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट

Vijaykumar Dudhale

National Politics News : इंडिया आघाडीतसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काही मुद्द्यांवर मतभिन्नता आहे. सर्वांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, लोकसभेसाठी जेवढं शक्य आहे, तेवढं विधानसभा निवडणुकीसाठी सोपं नाही, असे सांगून शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवले. (Difference of opinion in some places even in India Aghadi: Sharad Pawar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील सभेत शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल केला होता. त्याला पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण घेतलेल्या निर्णयाची यादीच सादर केली. त्यात कर्जमाफीपासून शेततळ्यांची योजना व इतर योजनांचा उल्लेख केला. मोदींनी २०१५ मध्ये माझ्या कामाचे कौतुक केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना वस्तुस्थितीचे भान नाही असं दिसतंय, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पत्रकार परिषदेतच पवारांना इंडिया आघाडीत आणखी काय करायची गरज आहे, की ज्यामुळे एकजिनसीपणा येईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवले. इंडिया या संकल्पनेत आम्हा सर्वांना एकत्र बसून काही गोष्टींवर विचार करावा लागेल. आमच्यामध्ये काही ठिकाणी वेगवेगळी मतं आहेत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्र राहावं, असं इंडिया आघाडीतील बहुतांश लोकांचं मत आहे. पण, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आमच्यामध्येही काही ठिकाणी मतभिन्नता आहे. काही राज्ये अशी आहेत की, त्या ठिकाणी काँग्रेस आणि स्थानिक प्रादेशिक पक्षही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी एका टेबलवर बसून सोडविल्या पाहिजेत, अशी आमच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा करत असताना राज्यांतील निवडणुकांमध्ये ते तेवढंसं सोप नाही, जेवढं लोकसभेसाठी शक्य आहे, असे सांगून पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडी राहील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT