Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathi
Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathi sarkarnama
मुंबई

संभाजीराजेंनी मतांची तयारी केलीय... असं संजय राऊतांनाही वाटतयं!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवबंधन बांधण्यासाठी 'मातोश्री' वर येण्याचे निमंत्रण फेटाळत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी सोमवारी कोल्हापूर गाठले. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतल्याचे सांगत शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजेंना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याचा मुद्दा फेटाळल्याने राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराचे प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे. (Sambhaji Raje News updates)

शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि चंद्रकांत खैरे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधण्याचे आवाहन धुडकावून संभाजीराजे आज सकाळी कोल्हापूरला रवाना झाले. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून पाठिंबा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

शिवसेनेने राज्यसभेसाठी दोन उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. हे दोन्हीही उमेदवार आम्ही निवडून आणणार, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेनेतील जुन्या नेत्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारणे किंवा पाठिंबा न देणे हे पक्षाच्या पुढील वाटचालीस मारक ठरेल, असा एक प्रवाह शिवसेनेच्या काही आमदारांचा आहे.

शिवसेना दोन जागा लढवणार आहे. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ व ते निवडूनही आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या जागेसाठी जेव्हा एखादा उमेदवार असे सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देणार आहे हे निश्चित. अशावेळी आम्ही मध्ये पडणे योग्य नसल्याचेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT