Disha Salian case News updates| Narayan Rane News| Nitesh Rane News|
Disha Salian case News updates| Narayan Rane News| Nitesh Rane News|  Sarkarnama
मुंबई

राणे पिता-पुत्रांना पुन्हा अटकेची भिती; घेतली न्यायालयात धाव

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (nitesh Rane) यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशा सॅलियन मृत्यूनंतर बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दिशाची आई वासंती सॅलियन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Fearing arrest, Narayan Rane and Nitesh Rane rushed to the court)

दरम्यान, दिशाच्या मृत्यू प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशाच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर दिशाची आई वासंती सॅलियन यांनी राणे पिता पुत्रांच्या विरोधात मुलीच्या मृत्यूनंतर होणाऱ्या बदनामीची तक्रार नोंदवली होती. (Disha Salian case news updates)

या तक्रारीनंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजरही झाले. त्यानंतर आता वासंती सॅलियन यांच्या तक्रारीवरुन नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत राणेंनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा यावेळी राणेंनी केला. तसेच सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही दिला होता. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

तर पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात राणेंच्या कोठडीची मागणी केली आहे. दिशाच्या मृत्यूबाबत राणेंनी ज्या पुराव्यांच्या आधारे दावे केले त्यांनी पुरावे पोलिसांना सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही राणेंनी त्यांच्याकडे असलेला पुरावा तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे नक्की कोणता पुरावा आहे, पुरावा नक्की आहे की नाही, हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, राणे पितापुत्र दिशाच्या मृत्युचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. त्यामुळे ते कोणत्या पुराव्यांच्या आधारे आरोप करत आहेत. पुरावे नसताना ते दिशाची बदनामी करत असतील तर त्यामागील हेतू शोधणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT