Nitesh Rane, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिन चिट मिळताच राऊतांचा CM फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल

Aditya Thackeray Clean Chit : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपींची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असं सांगत पोलिसांनी आदित्य ठाकरेंना क्लिन चिट दिली आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना क्लिन चिट मिळताच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणेंवर टीका केली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Jul : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात दिशा सालियनची हत्या झाली तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोस्टमार्टममध्ये सिद्ध झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपींची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असं सांगत पोलिसांनी आदित्य ठाकरेंना क्लिन चिट दिली आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना क्लिन चिट मिळताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे.

आदित्य यांना क्लिन चिट मिळाली असून आता देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. तर नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे, असं म्हणत त्यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिन चिट रिपोर्ट आला आहे. हे पोलिस आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही ती तुम्हीच स्थापन केली होती. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्याचं काम केलं.

मात्र, आता सत्य समोर आलं आहे. आता काय करणार? असा सवाल करत सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. शिवाय तो जो राणेंचा मुलगा आहे ना. तो एवढा एवढा, नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे.

ज्यांनी ज्यांनी आरोप केले आणि बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे. तुम्ही यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता. पण लक्षात ठेवा तुमच्यावर एक दिवस डाव उलटला जाईल. तेव्हा आम्ही देखील बघून घेऊ, असा इशाराही राऊतांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT