Disha Salian Case news, Disha Salian parents news
Disha Salian Case news, Disha Salian parents news Sarkarnama
मुंबई

कारवाईचे आदेश द्या अन्यथा आत्महत्या करू! दिशाच्या आई-वडिलांची राष्ट्रपतींना आर्त हाक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) आई-वडिलांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे धाव घेतली आहे. मुलीची बदनामी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Disha Salian parents news)

मुलीची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची तक्रार दिशाच्या आई-वडिलांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे. या पाच पानी पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली आहे. दिशाला न्याय मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, अन्यथा आम्ही आमचे जीवन संपवू, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, दिशाच्या आई वासंती सॅलियान यांनी यापूर्वीही राजकीय नेत्यांना मुलीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचे आवाहन केले आहे. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. हे लोक आता आमची बदनामी करत आहेत. त्यांच्या राजकारणासाठी माझ्या मुलीच्या नावाचा वापर केला जात आहे. हे थांबायला हवं. आम्हाला शांततेत जगू द्या, अशी विनवणी वासंती सॅलियन यांनी केली होती.

नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे. दिशाच्या पालकांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. राणे पिता-पुत्रांकडून या प्रकरणावर सातत्याने भाष्य केलं आहे. दिंडोशी न्यायालयाने त्यांना काही अर्टी-शर्तीसह नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Disha Salian Case News Updates)

दरम्यान, मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. दिशाचे आई-वडीलांनीही महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणावर राणेंकडून अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता दिशाच्या आईवडिलांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित मोठं पाऊल उचललं आहे.

''दिशावर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशासोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत विधान केले होते. दिशाच्या मृत्यूबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा राणे पिता-पुत्र करत असले तरी तो सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही त्याबाबतचा पुरावा दोघांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे हा पुरावा काय आहे हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी राणे पितापुत्राच्या अटकपूर्व जामिनाला प्रतिज्ञापत्रा्द्वारे विरोध करताना म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT