BJP Leaders Unhappy with Eknath Shinde:
BJP Leaders Unhappy with Eknath Shinde: Sarkarnama
मुंबई

BJP Leaders Unhappy with Eknath Shinde: भाजप वरिष्ठांची एकनाथ शिंदेंवर नाराजी; तर.. राजीनामा तयार ठेवण्याच्या सुचना?

सरकारनामा ब्युरो

BJPs Senior leaders unhappy with CM Eknath Shinde: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. (Displeasure of BJP seniors on Eknath Shinde; So..resignation instructions?)

इतकेच नव्हे तर, आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा, असंही शिंदेंना दिल्लीतून सांगण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे केंद्रात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री अमित शहा हेदेखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.अशातच एकीकडे भाजपलाच एकनाथ शिंदे नकोसे झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे देखील नाराज असल्याने त्यांच्या गावी साताऱ्याला गेल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.या घडामोडींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. (BJP-Eknath Shinde politics)

याबाबत राजकीय वर्तुळातही अनेक कारणं चर्चेत आहेत.

- मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदेना जनतेवर हवी छाप सोडता आली नाही.

- एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह केलेल्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत आहे.

- सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे लोकाभिमुख निर्णय घेता आले नाहीत

- सत्तांतरानंतरही ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांसारख्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे अधिक छाप पाडू शकले नाहीत.

- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८३ हजार कोटी रुपयांचा निधी तर भाजपला २ लाख कोटींचा निधी.

- एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन आगामी निवडणूक लढल्यास भाजपला काहीही फायदा होणार नाही.

- वेदांता फॉक्सकॉन, खारघर दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे एकाकी पडलेत

मराठा नेता या उद्देशाने भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde news) यांना सोबत घेतलं होतं.पश्चिम महाराष्ट्रात असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं तोडून ते तिथे स्वत:च आणि भाजपचं वर्चस्व निर्माण करतील, अशीही भाजपची अपेक्षा होती. पण एकनाथ शिंदेंना ठाणे आणि पालघरच्या पलीकडे जाऊ शकलेले नाहीत, असे एक चित्र दिसत आहे. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिंदे यांच्यावर नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे, राज्यातील सत्तांतरानंतर भाजपच्या बाबतीत नाराजीचा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला वीस जागांसाठीही संघर्ष करावा लागणार असल्याचं काही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्व कारणांमुळे भाजपच्या नेतृत्त्वाला आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबत पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT