Thackeray vs. Shinde latest news
Thackeray vs. Shinde latest news sarkarnama
मुंबई

Thackeray vs. Shinde सत्तासंघर्षांत जयंत पाटलांनी केला मुख्यमंत्र्यांचा 'तो' फोटो शेअर ; चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. 'शिवसेना आमचीच,' असा दावा शिंदे गटाने केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे होत आहेत. (Thackeray vs. Shinde latest news)

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा काल (शनिवारी) सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले. या सोहळ्याचा फोटो जयंत पाटलांनी टि्वट करीत आक्षेप घेतला आहे.

"मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही," असे म्हणत जयंत पाटलांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लळीत यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणे योग्य आहे का, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.

"महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील," या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांचं कौतुक केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT