Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati sarkarnama
मुंबई

राज्यपालांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? समजत नसेल तर उठाव होणारच : संभाजीराजे संतप्त!

Sambhajiraje Chhatrapati : कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही, महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये.

सरकारनामा ब्यूरो

Sambhajiraje Chhatrapati : शिवभक्तांच्या भावना समजत नसेल तर उठाव हा होणारच, असा सज्जड इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा दिला आहे. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आता संभाजीराजेंच्या या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनीही समर्थन दिले आहे. राऊत म्हणाले, 'संभाजीराजांची भावना ही समस्त महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे.'

संभाजीराजे यांनी ट्विट करत, आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले, "भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच," अशा रोखठोक शब्दात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय होते कोश्यारींचे वादग्रस्त विधान ?

'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है. मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT