Dombivali News : Ambadas Danve : Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Dombivali News : 'दानवेंची नगरसेवक होण्याची पात्रता नाही' ; म्हस्केंची जहरी टीका!

सरकारनामा ब्यूरो

Dombivali News : "नकली हिंदुत्ववादी आता खूप निर्माण झाले आहेत," असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांची संभाजीनगर मध्ये नगरसेवक व्हायची देखील पात्रता नाही, असे म्हस्के यांनी म्हंटले आहे.

श्री मलंगगडावरचा रविवारी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच गडावर शिंदे व ठाकरे या दोन्ही गटाकडून वेगवेगळी आरती करण्यात आली. या यात्रेला दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी शिंदे गटावर टिका करताना, खरे हिंदुत्ववादी आम्हीच, असे म्हणत शिंदे गटाला डिवचले होते. याला शिंदे गटाचे प्रवक्ते म्हस्के यांनी उत्तर दिले आहे.

"धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारसा पुढे नेत आहेत. निवडणुका आल्या की विरोधकांना हिंदुत्व आठवते. विरोधकांकडे काही गोष्टी उरल्या नाहीत. त्यामुळे टीका करतात म्हणून आम्ही त्या कडे लक्ष देत नाही. यांना शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट असं म्हणायला यांना लाज वाटत होती. आता हे वंदनीय म्हणायला लागले आहेत. ज्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी प्रथम बोलावं. ज्या संभाजीनगर मधून विधान परिषदेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळे दानवे निवडून आले आहेत. त्यांना तिकडे विचारतो कोण ? त्यांची तिथे नगरसेवक होण्याची पात्रता नाही, असे म्हस्के म्हणाले.

उद्धव ठाकरे का नाही आले ?

मलंगगड यात्रेत त्यांना का नाही वाटलं यावं या ठिकाणी दर्शन घ्यावे ? काय चाललंय इथे ? आज ते येऊ शकले असते. ठीक आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीयेत म्हणून काय झालं. मलंगड यात्रेत ते असेही येऊ शकले असते. मात्र यांनी घरात बसून हिंदुत्व टिकवायचं फक्त, मतांकरिता हिंदुत्वाच्या भाषा करायच्या, एरवी हिंदुत्व विसरायचे. त्यामुळे ते काय बोलतात यावर आम्हाला प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही, अशी टीका ही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT