Dombivali News Vijay Salvi Uddhav Thackeray
Dombivali News Vijay Salvi Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Dombivali News : ठाकरे गटाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा खोडा : अखेर न्यायालयात बाजी जिंकली!

सरकारनामा ब्यूरो

Dombivali News : शिवसेना ठाकरे गटाचे कल्याणचे अध्यक्ष विजय उर्फ बंड्या साळवी यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'हिंदूहृदयसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धा' आयोजित केले आहे. मात्र ऐनवेळी पालिका आयुक्ताने या स्पर्धेची परवानगी रद्द केली होती. यामुळे हा वाद न्यायालयात गेला, आता न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पर्धेची परवानगी मिळाली आहे व पालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

साळवी यांनी स्पर्धेसाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या होत्या. मात्र शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहितेच कारण देत पालिका आयुक्तांच्या आदेशावरुन मालमत्ता विभागाने साळवी यांच्या स्पर्धेची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले. याविषयी साळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पालिकेचा आदेश रद्द करत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शरीर सौष्ठव स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला असून ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण मुरबाड जिल्हा यांच्या वतीने 23 जानेवारीला ''हिंदुहृदयसम्राट श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे'' आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील जयंत देवळेकर क्रीडांगणात होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयोजक साळवी यांनी पालिका प्रशासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या.

स्पर्धा तोंडावर आली असताना शिक्षक पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागली असल्याचे कारण दाखवत पालिका प्रशासनाने साळवी यांच्या स्पर्धेची परवानगी 17 जानेवारीला रद्द केली. अचानक स्पर्धेची परवानगी रद्द केल्याने आयोजक साळवी यांनी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. अॅड. आर.एस.दातार, अॅड. दुश्यंत पगारे व अॅड. ध्रुती दातार यांनी साळवी यांची बाजू न्यायालयात मांडली.

पालिकेतर्फे ॲड. ए. एस. राव यांनी 16 डिसेंबरपासून शिक्षण मतदारसंघाची आचारसंहिता ठाणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द केली आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्याचा प्रतिवाद याचिकाकर्ते साळवी यांच्यातर्फे करताना ॲड. दातार यांनी 16 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू आहे. जिल्हाप्रमुख साळवी यांनी 6 जानेवारी रोजी पालिकेला पत्र देऊन शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण मैदान 22 आणि 23 जानेवारी रोजी उपलब्ध करुन देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांच्या आदेशावरुन मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक भागाजी भांगरे यांनी साळवी यांना भवानीनगर मधील दिवंगत जयवंत देवळेकर क्रीडांगण दोन दिवस स्पर्धेसाठी उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली. 11 जानेवारीला रितसर भाडे भरुन साळवी यांनी हे मैदान बुक केले.

पालिकेच्या सर्व अटीशर्तींचे पालन करुन आयोजकांनी स्पर्धा पार पाडण्याची हमी पालिकेला दिली. दोन महिन्यापासून जिल्हाप्रमुख साळवी ठाणे जिल्हा बाॅडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिसरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले असताना अचानक पालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन स्पर्धा रद्द करणे योग्य नाही. परवानगी देण्यापूर्वी पालिकेला आचारसंहिता माहिती नव्हती का, असे प्रश्न ॲड. दातार यांनी न्यायालयात उपस्थित केले.

न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी आणि न्यायाधीश सुनील शुक्रे यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू एकूण घेत पालिकेचा स्पर्धा रद्द करण्याचा आदेशच रद्द ठरविला आहे. तसेच असा आदेश काढणाऱ्या मालमत्ता विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT