Dombivli Minor Death Case | Pregnancy Report | Railway Police Sarkarnama
मुंबई

Dombivli train Accident : डोंबिवलीत लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलीच्या अपघाताला धक्क्कादायक वळण, पोस्टमार्टेममधून समोर आली वेगळीच माहिती

Dombivli Minor local train Death Case : 2 ऑगस्ट 2026 रोजी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेत अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आले आहे. लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले जात होते.

Jagdish Patil

Dombivli Minor Death Case : डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आले आहे. सुरुवातीला हा केवळ रेल्वे अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत असून, या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

तपासात हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले असून, पोस्टमार्टेम अहवालातून मृत अल्पवयीन तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना 2 ऑगस्ट 2026 रोजी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली होती. लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले जात होते. मात्र, तपासातून या प्रकरणाची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

चॅटिंगने उलगडला तपासाचा धागा

डोंबिवली जीआरपी पोलिसांनी तपासादरम्यान मृत तरुणीच्या मोबाईलमधील चॅटिंगची तपासणी केली. यामधून तिचे डोंबिवलीत राहणाऱ्या राज पकड या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. दोघांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.

यानंतर पोलिसांनी राज पकड याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौकशीत पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. त्यानंतर या प्रकरणात राज पकड याला अटक करण्यात आली. दरम्यान, पोस्टमार्टेम अहवालात तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

अल्पवयीन तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रेमसंबंध, मोबाईल चॅटिंग आणि गर्भधारणेची बाब समोर आल्याने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. राज पकड हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT