Police officials after arresting three accused in Dombivli assault case  sarkarnama
मुंबई

Dombivli Crime : डोंबिवली हादरले! महिलेचा अमानुष छळ करत अत्याचार; तिघे गजाआड

Dombivli woman Assault Case : महिलेवर अत्याचार तिला धमकावणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News : पार्टीच्या बहाण्याने बोलावून एका २२ वर्षीय महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कल्याणमधील काटेमानिवली नाका परिसरात वास्तव्यास असून भिवंडी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिची ओळख रिक्षाचालक चेतन चव्हाण याच्याशी झाली होती. तो तिला काही वेळा कामाच्या ठिकाणी सोडत असल्याने त्यांच्यात ओळख वाढली होती.

२६ मार्च रोजी रात्री महिला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी भिवंडी येथे गेली असताना चेतनचा तिला फोन करत पार्टी करूया असे सांगितले. तसेच तिला दुर्गाडी परिसरात बोलावले. तेथे चेतनसोबत त्याचा मित्र हेमंत चव्हाणही उपस्थित होता. त्यानंतर तिघांनी मद्याची खरेदी केली. पुढे हेमंतने आपल्या मामालाही पार्टीत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला ‘चांगला माणूस’ असल्याचे सांगत महिलेची समजूत काढण्यात आली.

यानंतर सर्वजण खंबाळपाडा येथील नव्याने बांधलेल्या इमारतीतील एका खोलीत गेले. तेथे महिलेवर जबरदस्तीने मद्यपान करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मद्यप्राशनानंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने विरोध दर्शविला. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर मारहाण केली. याच वेळी हेमंतचा मामा उमेश वर्मा याने महिलेवर अत्याचार केला.

या कृत्यात चेतन व हेमंत यांनी महिलेचे हातपाय पकडून तसेच तोंड दाबून आरोपीस मदत केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर ही बाब कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी आरोपींनी तिला दिली.

या प्रकारानंतर आरोपींनी महिलेला तिच्या घराजवळ सोडले व तेथून पसार झाले. मानसिक धक्क्यात असलेल्या महिलेने दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार महिलेने टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 28 मार्च रोजी चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड व सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय गणगे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना जेरबंद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT