Dnyaneshwar Singh Transfer Latest News Sarkarnama
मुंबई

आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंह यांची थेट उत्तर भारतात बदली

Dnyaneshwar Singh : आता महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG सचिन जैन असतील.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांना याला अटक करण्यात आल्यानंतर बराच राजकीय गदारोळ झाला होता. आर्यन खान यास जाणीवपूर्वक अमली पदार्थांच्या या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात येत होता. (Dnyaneshwar Singh Transfer Latest News)

सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर काही दिवसात वानखेडे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी या सर्व प्रकरणाचा तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकरणात आर्यन खान यास जाणीवपूर्वक अडकवण्यातआल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांची बदली थेट उत्तर भारतात करण्यात आली आहे.

दरम्यान, आता ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आता उत्तर क्षेत्राचा कार्यभार सोपवण्यात आला आल्याने आता महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG सचिन जैन असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT