DyCM Ajit Pawar did it for Satara; Admission process of Satara Medical College from December  
मुंबई

अजित पवारांनी साताऱ्यासाठी करून दाखविले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून महाविद्यालयाच्या कामासाठी 419 कोटी रूपयांच्या तरतुदीला वित्तमंत्री या नात्याने गती देत भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

उमेश बांबरे

सातारा : येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गुरूवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबरमध्ये शंभर विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश देता येणार आहे .केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून औपचारिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे डीन संजय गायकवाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. DyCM Ajit Pawar did it for Satara ...

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या प्रयत्नोमुळे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे सर्वात्कृष्ट असे मेडिकल कॉलेज साताऱ्यात उभारले जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले. 

डॉ संजय गायकवाड म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णानगर येथे जलसंपदा विभागाची 64 एकर जागेत विस्तारित इमारत, वसतीगृह इतर सुविधांसाठी उपलब्ध केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून महाविद्यालयाच्या कामासाठी 419 कोटी रूपयांच्या तरतुदीला वित्तमंत्री या नात्याने गती देत भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

राष्ट्रीय वैयकीय आयोगाची प्रमाणित मानकांच्या परिपूर्ततेसाठी सातारा जिल्हा रुग्णालय, जंबो कोविड हॉस्पिटल व सैदापूर येथील अरविंद गवळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीत पाचशे बेडचा कोटा आयोगाच्या निरिक्षणासाठी उपलब्ध करण्यात आला होता. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या त्रिसदस्यीय पथकाने जुलै महिन्यात साताऱ्याचा दौरा करून विस्तारित इमारती, सहयोगी प्राध्यापक आस्थापना आकृतीबंध, प्रत्यक्ष जागेला भेट, इतर वैद्यकीय सुविधा, सर्वच गोष्टींची तपशीलवार माहिती घेतली होती.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी मेडिकल ट्रस्टची स्थापना, राज्य सरकारची परवानगी, राज्यस्तरीय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परवानगीनंतरच महाविद्यालयाचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अंतिम मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे, असे  प्राचार्य डॉ संजय गायकवाड यांनी सांगितले. 

ते म्हणाले, सध्या महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात मिरज व पुणे येथील प्राध्यापकांची आस्थापना साताऱ्यात वर्ग करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ( नीट ) च्या द्वारे होतात. यंदा नीट च्या दुसऱ्या टप्प्यात साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे समावेशन आणि डिसेंबरला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT