Raj Kundra and Shilpa Shetty Latest Marathi News
Raj Kundra and Shilpa Shetty Latest Marathi News File Photo
मुंबई

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पाय खोलात; आता ईडीनं आवळला फास

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अडचणी वाढल्या आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला मागील वर्षी अटक केली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. आता सक्तवसुली संचालनालयाने त्याच्या भोवतीचा फास आवळला. (Raj Kundra Latest Marathi News)

मुंबई पोलिसांपाठोपाठ ईडीने कुंद्रावर मनी लाँर्डिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण या प्रकरणाशी संबंधितच हा गुन्हा आहे. उच्च न्यायालयाने राज कुंद्राची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जामिनावर सुटका केली आहे. (ED has registered a money laundering case against Raj Kundra)

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली होती. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी १ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कुंद्राने पॉर्न फिल्मसाठी अनेक अॅप्लिकेशन तयार केली होती. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पॉर्न व्हिडीओ दाखवले जात. यासाठी यूजरकूडन पैसे घेतले जात. कुंद्रा हा भारतात पॉर्न फिल्म तयार करुन वुई चॅटच्या माध्यमातून विदेशात पाठवत असे. तेथे ते वेगवेगळ्या अॅप्लिकेशनवर अपलोड केले जात. यासाठी त्याने 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कुंद्रा याच्या ब्रिटनमधील भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. ही कंपनीही पॉर्न फिल्म दाखवत असे.

कुंद्रा याने या व्यवसायासाठी पाच जणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. या ग्रुपची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या ग्रुुपवर त्याच्या पॉर्न फिल्मच्या व्यवसायाचे सर्व तपशील आहेत. त्याने किती पॉर्न फिल्म बनवल्या, त्यासाठी किती खर्च केल्या आणि त्यातून किती उत्पन्न मिळाले, याचीही माहिती पोलिसांनी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT