Z S Poonawalla
Z S Poonawalla Sarkarnama
मुंबई

Z S Poonawalla: ईडीची मोठी कारवाई; झेड.एस.पूनावालांची 41 कोटींची मालमत्ता जप्त

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पुण्यातील उद्योगपती झेड.एस.पूनावाला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. झेड.एस.पूनावाला यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे झेड.एस.पूनावाला यांना मोठा धक्का बसला आहे.

पनामा पेपर प्रकरणामध्ये झेड.एस.पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने झेड.एस.पूनावाला यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील तब्बल 41.64 कोटी रुपये किमतींची मालमत्ता जप्त केली आहे.

दरम्यान, ईडीकडून फेमा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. झेड.एस.पूनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध ईडीची चौकशी सुरु आहे. पनामा पेपर प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तर या प्रकरणी अधिक तपास ईडीकडून करण्यात येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT