ED Sarkarnama
मुंबई

ED News : ईडीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन कोटीची खंडणी अन् ब्लॅकमेलिंगचा खेळ!

ED Officers FRI Police : अटक आणि कार्यालय बंद करण्याची धमकी देत खोटी कागपत्रे दाखवून व्यापाऱ्यांकडून तब्बल पाच कोटीची खंडणी मागण्या दोन ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Roshan More

ED Officers FRI : कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या अधिकाऱ्यांनी 2.25 कोटी रुपये उकळल्याचे आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील गोरेगावमधील बांगूर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित गर्ग (सहाय्यक संचालक ईडी, जयपूर), देवेंद्र गुप्ता ( अंमलबजावणी अधिकारी) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुंबईतील 'विंट्री टेक' कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता यांनी मालाडमधील वस्सा याच्या कार्यालयावर छापा मारला. तेथे कागदपत्रे अनियमित आहेत, गुन्ह्यात मिळालेल्या पैशांशी संबंधित व्यवहार करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर अटकेची तसेच कार्यालय बंद करण्याची भीती दाखवून पाच कोटीची खंडणी मागितली.

2.25 कोटी दिले

अटक टाळण्यासाठी पाच कोटीची मागणी केली. त्यानंतर 2.25 कोटी रुपयांमध्ये हा तथाकथित व्यवहार ठरला. तक्रारीनुसार अधिकाऱ्यांना व्यापाऱ्याने एक कोटी रुपये दिले. तसेच दुसऱ्या दिवशी 1.25 कोटी रुपये दिले.

मात्र, या प्रकरणात आरोपी येवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी वरिष्ठ नाराज आहे, असे सांगत दरमहा नियमीत हप्त्याची मागणी केली. सततच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तक्रारदार वस्सा यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना आरोपींना त्यांना फसवल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ या प्रकरणी तक्रार केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT