Kirit Somaiya,Anil Parab sarkarnama
मुंबई

आता तरी EDच्या चौकशीला परब हजर राहतील ; सोमय्यांचा टोला

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) खोचक टि्वट शेअर करीत अनिल परबांना डिवचलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांना समन्स बजावले आहे. त्यांना येत्या २८ तारखेला ईडीच्या कार्यलयात हजर राहुन आपला जबाब देण्यास सांगितलं आहे. अनिल परब यांना यापूर्वीही समन्स पाठविण्यात आले होते, हे दुसरं समन्स आहे. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) खोचक टि्वट शेअर करीत अनिल परबांना डिवचलं आहे.

शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना यापूर्वी ता. ३१ ऑगस्ट रोजी पहिलं समन्स बजावण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी आपला नियोजित कार्यक्रम असल्याने जबाब देण्यास वेळ मागितला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं. आता ईडीनं पुन्हा एकदा परबांना समन्स बजावलं आहे. त्यामुळे परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

“आशा आहे की आता तरी अनिल परब चौकशीला हजर राहतील”, असं टि्वट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती.

Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT