Yashwant Jadhav Latest news
मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते यशवंत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. प्राप्तिकर विभागानंतर आता जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील गुंतवणुकीबाबत चौकशी करण्यासाठी हे समन्स बजावल्याची शक्यता आहे.
प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधवाच्या कंपनी व्यवहार मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने बेनामी कंपनीची चौकशी केली. यासोबतच जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मोठी रक्कम गुंतवणूक केली. ही गुंतवणूक कशी केली याची चौकशी ईडी करणार आहे. यासाठी आयकर विभागाकडूनही यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातही जाधव यांच्या 56 मालमत्ता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. जाधव यांनी तब्बल सहा कोटींचे दागिने रोखीनं घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी चार दिवस ठाण मांडून होते. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड आली आहे.
प्राप्तिकर विभागाने चौकशीच्या पहिल्या टप्यात जाधव याच्याकडे 36 मालमत्तांची नोंद केली होती. आता याता वाढ होऊन मालमत्तांची संख्या 56 वर पोचली आहे. त्यांच्या अन्य काही मालमत्तांचा तपास सुरू आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर जाधव राहत असलेल्या इमारतीतील अनेक घरेही जाधवांनी विकत घेतली आहेत. याच घरांच्या खरेदीतून त्यांनी 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या डायरीत मातोश्री अशी नोंद असल्याने राजकारण तापलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर या डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी पहिलं नाव 'केबलमॅन' असून त्याच्यासमोर एक कोटी 25 लाख रुपये दिल्याची नोंद होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.