Mahadev Online App Case Sarkarnama
मुंबई

ED Raid in Mumbai : मुंबईसह देशातील ३९ ठिकाणी ईडी'ची मोठी कारवाई ; बॉलिवूड अभिनेते, गायक रडारवर

अनुराधा धावडे

Mumbai ED Action: ऑनलाइन बेटिंगसाठी कुप्रसिद्ध झालेल्या महादेव सट्टा अॅपवर अंमलबजावणी संचालनालयाने (ed) मोठी कारवाई केली आहे. ईडीने या अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर छापे टाकले आहेत. या कारवाईत सुमारे 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ऍपचे प्रमोटर असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात बॉलीवूड अभिनेते आणि गायक, गायिका, टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी हेदेखील ईडीच्या रडारवर आले आहे. त्यातच भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ असलम यांचीही नावे तपासात समोर आली आहेत.

तपास यंत्रणांनी भोपाळ, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी केलेल्या छापेमारीत ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे महादेव अॅप?

महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्य पोलिसांनी त्या अॅपवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन सट्टेबाजीचे हे नेटवर्क भारताबाहेर पसरल्याची माहिती आहे.

महादेव बेटींग अँपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रेटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याचा ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT