Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Nawab Malik News: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची नवाब मलिकांसाठी 'फिल्डिंग'; पण मलिक घेणार 'हा' निर्णय?

Maharashtra NCP Crisis: नवाब मलिकांना अजित पवारांच्या गटासोबत येण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते सोमवारी रात्री तुरूंगातून बाहेर आले. त्यामुळे मलिकांचा पाठिंबा आता राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. मलिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी 'फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी सकाळी नवाब मलिकांच्या कुर्ला येथील निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीत मलिकांना अजित पवारांच्या गटासोबत येण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची चर्चा आहे.

नवाब मलिक हे मलिक तुरूंगातून बाहेर आले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुळे यांनी जवळपास चार तास मलिकांच्या प्रक्रृतीची विचारपूस केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून नवाब मलिकांचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दोन्ही गटाच्या नेत्यांची मलिकांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असून आता नवाब मलिक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिकांनी कोणताही निर्णय घेतलेला नसून सध्या ते आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नवाब मलिक हे सध्या तरी तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंग प्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मलिकांना ११ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरूंगातून बाहेर आले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT