Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Eknath Khadse In Vidhanbhavan : एकनाथ खडसेंनी फडणवीसांच्या डोळ्यांत डोळे घालूनच केला वार !

Devendra Fadnavis Vs Eknath Khadse : न्यायालयातील असुविधांची यादीच खडसेंनी वाचून दाखवली

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : विधिमंडळाचे अधिवेशन अनेक कारणांनी गाजत आहे. राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खोचक टोले, वैयक्तिक टीका-टिपण्णी आणि गंभीर आरोपांनी राजकीय वातावरण तापतेही. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात डोळे घालून टोले लगावल्याने सभागृहाचे माहोल काहीसा गरम होता. (Latest Political News)

भाजपात असताना खडसेंवर भूखंड घोटाळ्याच्या आरोपातून गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्यावर न्यायालयाच्या चकारा मारण्याची वेळ आली. वारंवार भेट देत असल्याने खडसेंनी न्यायालयातील समस्यांही जाणून घेतल्या. याच समस्यांचा पाढा वाचत शुक्रवारी खडसेंनी फडणवीसांना टोले लगावले आहेत. (Devendra Fadnavis)

फडणवीसांवर आरोप करताना खडसे म्हणाले, "यापूर्वी कधी कोर्टाची पायरी चढली नव्हती, मात्र मागच्या काही वर्षात काही जणांच्या कृपेमुळे बऱ्याच वेळा कोर्टात जायची वेळ आली आहे. एका कोर्टात १५ दिवसांनी तर दुसऱ्या कोर्टात ३० दिवसांनी जात असतो", असा खुलासाही एकनाथ खडसेंनी यावेळी केला.

यानंतर खडसेंनी न्यायालयातील अडणींची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले, वारंवार जात असल्याने मला लक्षत आले आहे की कोर्टात अनेक सुविधा कमी आहे. शिपाई नाही, स्टेनो नाही. 'टाईपिस्ट' नाही अशी परिस्थिती आहे. कोर्टाकडून सांगितले जाते की आम्हाला निधीही मिळत नाही. कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे कामे 'पेडींग' आहेत. अनेकांच्या तिसरी चौथी पिढी आली तरी 'केसेस' सुरूच आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT