Eknath Shinde-Sanjay Rathor-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Sanjay Rathor-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

संजय राठोड - मुख्यमंत्री भेटीवर मोठा खुलासा; मंत्रिमंडळात दिसणार की नाही?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले असल्याच्या बातमी काल प्रसिद्ध झाल्या होत्या. या भेटीत राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याबाबत चर्चा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

मात्र या बातम्यांवर आता खुद्द संजय राठोड यांनी खुलासा केला असून आपण उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतदारसंघातील कामांसंदर्भात मी काल एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्र निघालो. मी त्यांच्यासोबतच होतो, परंतु ते वर्षासाठी वळले आणि त्या रस्त्यावरून पुढे मी लिलावती हॉस्पिटलसाठी गेलो, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच मला मंत्रिमंडळात घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे, मी राजीनामा दिलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Eknath Shinde and Sanjay Rathod meet Chief Minister Uddhav Thackeray)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठाडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मात्र, पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांनी त्यांची तक्रार मागे घेतल्यामुळे संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रीपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान द्यावे, अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जात होती.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राठोड हे एकत्र दिसल्याने आणि त्यातही वर्षावर एकत्र गेल्याच्या बातम्यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आली होती.

संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेण्यासाठी पोहरादेवी येथे बंजारा समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीत राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे, यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते आंदोलन मुंबईत (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी २३ एप्रिल रोजी करण्याचा निर्णय पोहरादेवी येथील बैठकीत झाला होता.

भ्रष्टाचार आरोप असणाऱ्या मंत्र्याची सध्या चौकशी सुरू आहे, तरीही ते मंत्रिमंडळात आहेत. राठाडे यांच्यावरील कोणताही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही, तरीही त्यांना मंत्रिमंडळात का घेतलं जात नाही, असा सवाल महंतांनी उपस्थित केला होता. हा बंजारा समाजावर अन्याय आहे. राठोड यांना पुन्हा मंत्री केलं नाही तर येत्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही देण्यात आला होता, त्यामुळेच संजय राठोड यांच्या मंत्रीपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT