Eknath Shinde : Tanuja Gholap
Eknath Shinde : Tanuja Gholap Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : ठाकरेंना पुन्हा धक्का : उपनेतेपदी असलेल्या दिग्गज नेत्याची मुलगी शिंदे गटाच्या वाटेवर!

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. शिंदे गटाकडून ठाकरे गटावर धक्कातंत्र वापरले जात आहे. गेल्या पंधरा दिवसात ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग झाले आहे. यामध्ये मोठा प्रवेश म्हणजे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, भाऊसाहेब चौधरी यांनीच शिंदे गटात प्रवेश केला होता. आता माजी मंत्री घोलप यांची मुलगी शिंदे गटात प्रवेशाची तयारी करत आहे.

घोलप यांची मुलगी तनुजा घोलप यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर तनुजा यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामुळे तनुजा घोलप यांचा आता लवकरच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ही तनुजा घोलप यांच्या प्रवेशाला हिरवा कंदिल दाखवल्याचे समजते आहे.

बबनराव घोलप शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे दिग्गज नेते समजले जातात. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनेक काळापासून कार्यरत आहेत. शिवसेनेचे उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. युती सरकारच्या काळात ते राज्याचे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत.

युती सरकारच्या काळात घोलप समाज कल्याणकारी मंत्री होते. ते आतापर्य़ंत पाच टर्म आमदार राहिले आहेत. आता घोलप यांनाही आपल्याकडे खेचून शिवसेनेच्या गडाला भगदाड पाडण्याचे काम शिंदे यांच्याकडून होत आहे.

बबन घोलप व त्यांचे पुत्र अजूनही ठाकरे गटात आहेत. त्यांची आणखी एक कन्या व माजी महापौर नयना घोलप शिवसेना उद्धव ठाकरे गटातच आहेत, तर आता घोलप यांची दुसरी कन्या तनुजा घोलप लवकरच शिंदे गटात जातील, अशी चर्चा आहे.

यात एक विशेष गोष्ट म्हणजे, नुकतंच संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, कन्या माजी महापौर नयना घोलप उपस्थित राहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT