Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे तब्बल पाच तास अज्ञातवासात

Hemant Godse, Uday Samant, Dada Bhuse : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची चर्चा आहे. परिणामी आक्रमक झालेले खासदार गोडसे वारंवार मुख्यमंत्री शिंदेची भेट घेत आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : नाशिकमधून उमेदवारी फिक्स करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, मंत्री दादा भुसे तर मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून सामंताचे बंधून किरण सामंत आग्रही आहेत. मात्र या नेत्यांना पाच तास ताटकळत ठेवत मुख्यमंत्री शिंदे तब्बल पाच तास अज्ञातवासात होते. त्यांची वाट पाहून ठोस चर्चेशिवाय गोडसे नाशिकला परतले, तर भुसे, सामंत मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री नेमके कोठे आहेत, याबाबत कुणालाही काही माहिती समोर येत आहे. Eknath Shinde News

महायुतीत साताऱ्याच्या बदल्यात नाशिक अशी चर्चा असल्याचे पुढे येत आहे. मात्र सिटिंग खासदार म्हणून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी ही जागा सोडू नये अशी गळ शिंदेंना घातली आहे. यासाठी त्यांनी यापूर्वीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलेले आहे. गोडसे, भुसे हे शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. त्यानंतर उदय सामंतही तेथे पोहचले. त्यांनी दोन तास वाट पाहिली मात्र शिंदे काही आले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंशी (Shrikant Shinde) गोडसेंनी चर्चा केली आणि नाशिकला परतले. त्यानंतर सामंत आणि भुसेंनी तीन तास वाट पाहिली, मात्र मुख्यमंत्री शिंदेंची भेट झाली नाही. या पाच तासांच्या काळात शिंदे नेमके कुठे होते, याबाबतही कुणाला माहिती नव्हते. गोडसे, सामंत, भुसेंना मुख्यमंत्री भेटले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या पक्षाच्या आठ उमेदवार जाहीर केले आहेत. तर त्यात नाशिकचा समावेश नाही. नाशिकमधून भाजपसह अजित पवार गटानेही दावा ठोकला आहे. त्यातच साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची चर्चा आहे. परिणामी आक्रमक झालेले खासदार गोडसे वारंवार मुख्यमंत्री शिंदेची भेट घेत आहेत. या तणातणीच्या स्थितीत शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे आणि गोडसे यांची भेट झाली नसल्याचे गोडसेंची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT