gauri lankesh murder accused shrikant pangarkar Sarkarnama
मुंबई

Shrikant Pangarkar: गौरी लंकेश हत्येतील आरोपीवर शिवसेनेकडून दिलेल्या जबाबदारीबाबत CM शिंदे यांचा मोठा निर्णय

CM Eknath Shinde Big Decision on Shrikant Pangarkar: श्रीकांत पांगारकरने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात केलेला प्रवेश म्हणजे 'उंदराला मांजर साक्ष' असा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या (Gauri Lankesh Murder) प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर (shrikant pangarkar)याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. जालना विधानसभेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती.

या नियुक्तीवरुन शिवसेनेवर चौफेर टीका झाली. विरोधकासह शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी पांगारकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे जर कोणते पद देण्यात आले असेल तर त्या पद नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये संशयित असलेले श्रीकांत पांगारकरने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात केलेला प्रवेश म्हणजे 'उंदराला मांजर साक्ष' असा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

श्रीकांत पांगारकरने तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना स्फोटके, शस्त्रे खरेदी करण्यासाठी पैसा पुरवल्याचे राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीतून स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या काळात राज्यातील कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेली असताना अशा संशयित आरोपींचा पक्षप्रेवश हे राज्याच्या राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे.

निर्लज्ज महायुतीने राजकीय फायद्यासाठी राज्याची प्रतिमा पणास लावणे कदापी सहन केले जाणार नाही, अशा शब्दात पटोलेंनी शिवसेनेला फटकारलं होते . त्यानंतर शिवसेनेकडून श्रीकांत पांगारकर यांची नियुक्ती रद्द केली आहे.

माजी मंत्री, शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीतत पांगारकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांची शिवसेना जालना विधानसभेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती.

यातील आरोपी श्रीकांत पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.महाराष्ट्रातील तपास यंत्रणेच्या मदतीने कर्नाटकातील पोलिसांनी केलेल्या तपासात अनेकांना अटक केली होती.

श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत आणि ते परत पक्षात आले आहेत. २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती. यातील आरोपी श्रीकांत पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.महाराष्ट्रातील तपास यंत्रणेच्या मदतीने कर्नाटकातील पोलिसांनी केलेल्या तपासात अनेकांना अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT