Thane News : ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्तित होते. यावेळी बैठकीतच STEM या पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारी संस्थेतील संकेत घरत यांच्या नियुक्तीवरून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांची नेमणूक अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला.
यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिकृत आणि अनधिकृत इमारतींबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यासोबतच STEM मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे चर्चेस आणले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही दिले.
ठाण्याच्या डीपीडीसीची बैठक वादळी ठरली. या बैठकीदरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारी संस्थेतील संकेत घरत यांची नियुक्ती ही अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींनी केला. आमदार संजय केळकर यांनी अधिकृत आणि अनधिकृत इमारतींबाबत प्रश्न उपस्थित केला तर रईस शेख यांनीही भिवंडी महानगरपालिकेला STEM कडून पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, यामागे भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मोठा निर्णय घेत व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची तात्काळ उचलबांगडी केली. संकेत घरत यांचा तात्काळ चार्ज काढून टाका असे स्पष्ट आदेश देत, योग्य अधिकाऱ्याची निवड का झाली नाही, याचाही तपास करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीवेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या महाव्यवस्थापकपदी सहसचिव सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती करण्यात आली. या पूर्वी तात्पुरता पदभार सनदी अधिकारी अशिषकुमार शर्मा यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची या पदासाठी नियुक्ती निघाल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांनी मारली दांडी
ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), खासदार नरेश म्हस्के, आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, संजय केळकर, राजेश मोरे, सुरेश (बाळा मामा) म्हात्रे, किसन कथोरे यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.