Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत कुठं, काय चुकलं? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने देशभरात 400 पारचा नारा देत विरोधकांना मैदानात उतरण्यापूर्वीत गलितगात्र करण्याचा डाव टाकला. तोच डाव उलटल्याने लोकसभेत महायुतीतील भाजपसह इतर मित्र पक्षांवर उलटल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

देशात निवडणुकीते वारे वाहण्यापूर्वीच भाजपने 'अब की बार 400 पार' असा नारा देत लोकसभेचे वातावरण निर्मिती केली. 'एनडीए'ला 400 तर एकट्या भाजपला 370 जागा हव्या असल्याचाही दावा करण्यात आला. त्यातच कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्याने संविधानात बदल करण्यासाठीच 400 हून अधिक जागा हव्या असल्याचे विधान केले.

त्यानंतर देशभरातील विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली. याची परिणीती भाजपच्या जागा घटण्यात झाली. आता केंद्रात मोदी सरकार नसून 'एनडीए सरकार' असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे.

यावर एकनाथ शिंदे Eknath Shinde म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी चुकीची चर्चा घडवून आणल्याने आम्हाला कमी जागा मिळाल्या. राज्यातही नुकसान झाले. संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपण्याची चर्चा आदींचा फटका बसला.

मात्र तसे काही होणार नव्हते. त्यातच '400 पार'च्या नाऱ्यामुळे पुढे काहीतरी गडबड होणार, अशीच भावना लोकांत झाली होती. त्यातूनच लोकांनी महायुतीला मतदान केले नाही आणि आम्हाला कमी जागा मिळाल्या.

400 पार शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनीही महायुतीला नाकारल्याची कबुली शिंदेंनी दिली. नाशिकमध्ये कांद्याचा फटका आमच्या उमेदवारांना बसला. नाशिकमध्ये कांद्याने आम्हाला रडवले. तर मराठवाड्यात सोयाबीन, कापसाचे उतरलेल्या दराचाही फटका बसला. आता यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT