Uddhav Thackeray| Shrikant Shinde|
Uddhav Thackeray| Shrikant Shinde|  
मुंबई

एकनाथ शिंदे विसरले पण श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंचे पद लक्षात ठेवले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही टाळलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांनी पक्षप्रमुख पदाचा उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांना अशाच प्रकारे शुभेच्छा दिल्या. पण एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना आवर्जुन पक्षप्रमुख पदाचा उल्लेख केला आहे.

''पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....'' असे ट्विट श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! श्री. ठाकरे यांना निरोगी दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना!'' असे ट्विट करत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT