Bacchu Kadu,Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu,Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना एका महिन्यात दुसरे मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांनी यांनी मान्यता दिली आहे. तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बच्चू कडू यांनीही या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दरम्यान, याच महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या आचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला तब्बल 495 कोटींचा निधी दिला होता. या प्रकल्पामुळे 6 हजार 134 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. बच्चू कडू यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली होती. अशातच आता बच्चू कडू यांची दिव्यांगासाठीच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी मान्य करत त्यांना दुसरे गिफ्ट दिले आहे.

आमदार कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला होता. त्यावरून बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिका स्पष्ट करावी, म्हणत बच्चू कडू यांनी थेट वेगवेगळा विचार करू असा इशारा दिला होता. त्यानंतर हा वाद थेट शिंदे आणि फडणवीसांच्या पर्यंत पोहोचला होता. त्यांनीही वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

दरम्यान, बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करुन त्याचा कार्यभार बच्चू कडू यांच्याकडे द्यावा. बच्चू कडू यांना मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांना त्या मंत्रालयाची जबाबदारी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT