Ramdev Baba-Eknath Shinde
Ramdev Baba-Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी : रामदेवबाबांच्या दाव्याने वादात भर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमच्या हिंदू धर्म, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर आमचे आत्मीय प्रेम होते आणि मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेबांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असे विधान योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी केले आहे. (Eknath Shinde is the national successor of Balasaheb Thackeray : Ramdev Baba)

योगगुरु रामदेव बाबांनी आज (ता. ३० एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रामदेवबाबांनी वरील वक्तव्य केले आहे. तत्पूर्वी रामदेवबाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रामदेवबाबा म्हणाले की, आमच्या हिंदू, सनातन धर्माचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गौरवपुरुष आहेत. आपल्या राजधर्माबरोबरच ते सनातन आणि ऋषी धर्मही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मुंबईत आलो होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचे आत्मीय प्रेम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत. राजधर्माबरोबरच, सनातन धर्माच्या गौरव प्रतिष्ठेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद झाला.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावरून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद रंगलेला आहे. शिंदे गटाकडून खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा केला जात आहे. त्यासोबतच त्यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा वादही निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर आपत्रतेची कारवाई करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT