Eknath Shinde Live Update : शिंदे यांना ४० आमदारांचा पाठिंबा : भूमिकेवर ठाम!
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील संघर्ष आता नव्या वळणावर असतानाचा नवी घडामोड
सरकारनामा ब्युरो
दरम्यान शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना आता तब्बल ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
एक था कपटी राजा, असे उद्धव ठाकरे यांना डिवचणारे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले. पण तातडीने ते डिलीट केले. भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत सावध भूमिका घेत असताना अमृता यांनी मात्र स्वतःहून वाद ओढविणारे ट्विट केले. त्यामुळे सोशल मिडियात त्यांच्याबद्दल पुन्हा तिरकस काॅमेंट होऊ लागल्या. अखेर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.
Amruta Fadnavis tweet
उद्धव ठाकरे यांचे निरोप घेऊन नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटिला. नार्वेकर हे ठाकरे आणि शिंदे यांचे बोलणे करून देणार का, याची उत्सुकता आहे. शिंदे हे रश्मी ठाकरे यांच्याशी गेल्या दहा तासांत बोलले आहेत. मात्र थेट उद्धव यांच्याशी त्यांचे बोलणे झालेले नाही. ठाकरे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असला तरी त्यांनी नार्वेकरांकडे काय संदेश पाठवला असेल, याची उत्सुकता राहणार आहे.
Eknath Shinde-Uddhav
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे त्यांच्याशी चर्चाही सुरू ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र फाटक हे सुरत येथील लि मेरिडिअल हाॅटेलमध्ये पोहोचले. मात्र शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तत्परात दाखवली नाही. या हाॅटेलमध्ये पोलिस बंदोबस्त आहे. शिंदे यांनी सांगितल्याशिवाय कोणालाही हाॅटेलमध्ये सोडले जात नाही. शिंदे यांनी नार्वेकरांना भेटण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला नाही. त्यामुळे बराच वेळ नार्वेकर यांना हाॅटेलच्या गेटवर ताटकळत बसावे लागले. नार्वेकर हे गाडीतून उतरले नाहीत. पत्रकारांशीही ते बोलले नाहीत. अखेर वाट पाहिल्यानंतर नार्वेकर यांना प्रवेश मिळाला. आता नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.
महाविकास आघाडी सरकारीच एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांच्या बंडाची डोकेदुखी सुरू असतानाचा दुसरीकडे काॅंग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाचे पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. काल रात्रीपासूनच पक्षात त्यावरून धुसफूस सुरू होती. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना निरीक्षक म्हणून मुंबईत पाठवले आहे. त्यासाठीची बैठक पक्षाने बोलविली होती. त्यासाठी आमदारांना संपर्क करण्यात येत असताना पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याचे लक्षात आले. त्यांची नावे लवकरच समजतील.
Kamal nath
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अर्थ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बोलणी फिस्टकली आहेत, असाही घेतला जात आहे. ठाकरे हे आता शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिकांशी बोलणार आहेत. तेथे ठाकरे काय भूमिका काय घेणार, यावर एकनाथ शिंदे आपले धोरण ठरविणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपण सत्तेसाठी प्रतारणा करणार नसल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेनेचे नाव हटविल्याचे सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार वाचणार का, या प्रश्नावर पवार यांनी सरकार स्थिर असल्याचा दावा केला. शिंदे यांचे बंड शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हे यातून मार्ग काढतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांचा निर्वाळा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे, हे मला नव्यानेच कळत आहे, अशीही भूमिका पवार यांनी मांडली. कोणाला कोणत्या पदावर ठेवायचे, हा ठाकरे यांचा निर्णय असेल. त्याला आम्ही सहमत असू असाही निर्वाळा पवार यांनी दिला. शिवसेनेला एकनाथ शिंदेंशी चर्चा करू द्या, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, असेही पवार यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर आता शरद पवार हे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे सरकार स्थापनेच्या वेळेपासूनचे हे तिसरे बंड असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकार स्थापनेच्या वेळी देखील हरियाणात काही आमदार ठेवण्यात आले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली. विधान परिषदेच्या निकालावर बोलताना पवार म्हणाले की महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला. हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी काॅंग्रेसची होती, असेही पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस नेत्यांना मिठाई वाटण्यासाठी दिल्लीत गेले असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या नावांची यादी गुजराती भाषेत व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे शिंदे हे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक. या बैठकीत सर्व नेते, आमदारांना बोलावण्यात आल्याचे समजते.
कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी काही माध्यमांनी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी आपण शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य. भाजपकडून गुजरातमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सर्व नॉट रिचेबल आमदार सुरतमधील लि मेरिडियममध्ये असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करतील.
शंभुराज देसाई, संदीपान भूमरे, तानाजी सावंत, दादा भूसे, प्रताप सरनाईक यांच्यासह 20 च्या जवळपास आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती