Eknath Shinde Latest Marathi News, Rashmi Thackeray Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Rashmi Thackeray Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

दहा तासांत एकनाथ शिंदे अनेकदा रश्मी ठाकरेंशी बोलले!

ज्ञानेश सावंत

मुंबई : शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले असले तरीही ते पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत. 'मी किंवा आपल्या पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा, ' असे शिंदे हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना सांगत आहेत. मात्र, आमच्या भावना समजून घ्या, अशी विनवणी शिंदे हे रश्मी ठाकरेंना करीत आहेत. (Eknath Shinde Latest Marathi News)

शिवसेनेतील (Shiv Sena) नाराजीसह महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधील मतभेद आणि त्याच्या परिणामांमुळे शिंदे यांनी हा पवित्रा घेतल्याचीही त्यांनीच ठाकरे कुटुंबीयांपुढे कबुली दिली आहे. आमदारांना घेऊन मी कोणासोबत आणि कुठे जाणार नाही. आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असेही शिंदे यांनी ठाकरे कुटुंबियांना सांगितले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले आहेत. केवळ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याने ते भाजपसोबत जाऊन नवी राजकीय मोट बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र शिंदे हे गेल्या १० तासांत अनेकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य यांच्याशी बोलत आहेत. त्यातून ते त्यांना शिवसेना सोडून गद्दारी करणार नसल्याचेही सांगत आहेत.

दरम्यान, या चर्चेतूनच ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे शिंदेंच्या भेटीला गुजरातला निघाले आहेत. शिवसेनेत विशेषत: स्वपक्षीय आमदारांत बळ वाढवून आलेले शिंदे हे नेहमीच भाजपसाठी आशेचा किरण ठरले आहेत. याआधी शिंदे नाराज आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिंदेंना जमू देत नाहीत, त्यांच्यावर दबाव आणत असल्याच्या कारणे काढून भाजप नेते शिवसेना आणि शिंदेंना डिवचत असतात.

त्यावर काहीच शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले नाही. त्यामुळे शिंदेबाबत नेहमीच संशय व्यक्त केला जात होता. ठाकरेंपासून शिवसेनेच्या बहुतांशी मंत्री, नेते आणि आमदारांभोवती चौकशांचे फास आवळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांनी शिंदेंकडे कधीच वाकड्या नजरेने पाहिले नाहीत. तसे धाडस तेही करू शकत नाही. तरीही शिंदे हे शिवसेनेसोबत राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT