Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political crisis News, Shivsena Political Crisis
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political crisis News, Shivsena Political Crisis Sarkarnama
मुंबई

Maharashtra political crisis: शिवसेना ही शिंदे गटाचीच..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भरत गोगावले यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु झाली आहे, शिंदे गटाने बंडखोर 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा याचिकेत दावा केला आहे.

शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. आमच्याकडे अधिक आमदार असल्याचे शिंदे गटाने सांगितले आहे. ठाकरे सरकारचा ३८ आमदारांनी पाठिंबा काढल्याने सरकार अल्पमतात आले असून सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे.

शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरू केला असल्याचे बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT