Manohar Joshi, Eknath Shinde
Manohar Joshi, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

कच्च्या गुरूचे चेले नाही : सेनेच्या जुन्या नेत्यांना आपलेसे करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदार आणि खासदार यांच्यानंतर आपला मोर्चा शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेत्यांकडे वळवला आहे. शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली. तसेच ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची त्यांच्या निवास्थानी शिंदे यांनी भेट घेतली. याआधी त्यांनी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचीही भेट घेतली होती.

शिवसेनेच्या ४० आमदारांसह शिंदे यांनी बंड केले. त्यामुळे राज्यात सत्तातर झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी पक्षाच्या १२ खासदारांनाही आपल्याकडे वळवले. त्यानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेला धक्यामागून धक्के दिल्यानंतर शिंदे यांनी आता ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये ते स्वता: शिवसेनेचे नेते आहेत. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यातच ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीमधून शिवसैनिकांना संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मनोहर जोशी आणि लीलाधर डाके अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्या भेटीघेऊन शिवसैनिकांची सहानुभुती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच सेनेच्या जुन्या नेत्यांना आपलेसे करण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.

मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर शिंदे म्हणाले, आजची भेट ही सदिच्छा भेट होती. ते ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नव्हती...आता मी भेट घेण्यासाठी आलो. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात अनेकांनी काम केले. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा कमी येतील.

त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. त्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची भावना त्यांनी व्यक्त केली, असेही शिंदे यांनी सांगितले. या भेतीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केले...आम्ही कार्यकर्ते आहोत. आणखी काही लोकांची भेट घेऊ.. तेव्हा आपल्याला कळेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT