Eknath Shinde news : Shahshikant Shinde :
Eknath Shinde news : Shahshikant Shinde :  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' : मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर वार !

सरकारनामा ब्यूरो

Kasba By Election : भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला. या विजयानंतर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.

मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर जोरदार वार केला. आमचे जुने नेते काँग्रेसच्या विजयाचा एवढा आनंद साजरा करत आहेत की, ते म्हणतात ना, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा खूप मोठा आनंद झालाय. मोठं आश्चर्य पाहायला मिळतंय. त्यांना असंच आनंद साजरा करू द्या. मात्र तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने निवडणुका जिंकलेल्या आहेत. याकडेही महाविकास आघाडीने डोळसपणे पाहावं, असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंनी लगावला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कसब्याच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. ठाकरे म्हणाले, "पदवीधर निवडणुकीचे निकाल आणि कसब्याचा लागलेला निकाल हेच येणाऱ्या काळातील बदलाच्या आशेचं किरण आहे. वापरा आणि फेका ही निती भाजपला कसब्यात भोवली आहे. भारतीय जनता पक्ष किती घातक आहे हे आपण पाहायला हवं''.

"टिळकांच्या घराण्याबरोबर भाजपने काय केलं? तसेच गिरीश बापट हे आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवलं. हिच परिस्थिती आपल्याला मनोहर पर्रीकर यांच्याशी घडली होती. त्यांनाही आजारी असताना प्रचारात उतरवलं होतं. आता त्यांच्या मुलाला भाजपने बाजूला केलं. त्यामुळे भाजपची ही निती धोकादायक आहे'', असा घणाघात ठाकरेंनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT