शिवसेनेचे नेते, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. ते गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
सरकारनामा ब्युरो
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गेल्या 20 मेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गोप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मेळाव्यात केला आहे.
आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आव्हान, 'समोर या डोळ्यात डोळे घालून बोला'
ठाण्यात एकनाथ शिंदे गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरवर शाईफेक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात गुवाहाटीत असलेले 48 आमदार महाराष्ट्रात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गली गली मे शोर है, सरवणकर चोर है.. अशा घोषणा माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी दिल्या
महाविकास आघाडी भक्कम राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक येथे आघाडीच्या नेत्यांसाबत पार पडलेल्या बैठकीनंतर व्यक्त केला आहे.
सदा सरवणकर यांचे पोस्टर शिवसैनिकानी फाडले..
बंडखोर १५ आमदारांच्या घराबाहेर केंद्र सरकारची सुरक्षा
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा दिल्लीला जाणार
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी (naresh mhaske) शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
पैठणमध्ये संदिपान भुमरेंबाबत शिवसेनेत नाराजी
संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले- गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावं लागेल.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज दुपारी बाराच्या सुमारास समर्थक आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.