Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News
Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News Sarkarnama
मुंबई

फडणवीसांच्या शपथविधीआधी चित्रा वाघ राठोडांच्या नावावर आक्षेप घेतील?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : वर्षभरापूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपनं अधिकच आक्रमक भूमिका घेतली होती. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आणि अटकेसाठी भाजपने रान उठवलं होतं. प्रामुख्याने भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. त्यानंतर राठोडांना मंत्रिपद सोडावं लागलं. पण आता हेच संजय राठोड एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. (Chitra Wagh Latest Marathi News)

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर भाजपकडून (BJP) हे प्रकरण उचलून धरत संजय राठोडांवर (Sanjay Rathod) गंभीर आरोप केले होते. चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

'शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते संवेदनशीलपणे आहेत. त्यामुळं त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको,' असं वाघ यांनी म्हटलं होतं.

भाजपकडून राठोडांविरोधात रान उठवल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या अटकेसाठीही चित्रा वाघ व भाजप आक्रमक होते. आता हेच राठोड शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. शिंदे गट भाजपशी हातमिळवणी करून सत्तास्थापन करून शकतो. त्यामुळे या गटातील राठोड यांच्या नावावर चित्रा वाघ आक्षेप घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय राठोड यांच्यासह प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला होता. हे दोघेही शिंदे गटामध्ये आहेत. त्यामुळे या तीन नेत्यांना भाजप सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का, याचीही चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT