MLA Sanjay Gaikwad and Minister Sanjay Shirsat caught in viral videos sparking outrage across Maharashtra, damaging the Shiv Sena image and testing Eknath Shinde’s leadership Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : अखेर एकनाथ शिंदेंनी शिरसाट अन् गायकवाडांना दिली समज, म्हणाले, "शिवसेनेची प्रतिमा..."

Shivsena MLA controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची डोकेदुखी त्यांच्याच आमदारांनी वाढवली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना शिंदे गटातील आमदारांमध्ये निर्माण झाली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Jul : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची डोकेदुखी त्यांच्याच आमदारांनी वाढवली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

या नेत्यांच्या व्हिडिओमुळे शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना शिंदे गटातील आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांना आता पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची प्रतिमा मलिन करणारे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याची समज दोन्ही आमदारांसह इतर वाचाळवीर नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. अशातच त्यांनी आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर अधिवेशानात देखील याचे पडसाद उमटले.

गायकवाड यांचा व्हिडिओ कमी की काय म्हणून मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांचे बंडल असलेल्या बॅगेसोबतचा व्हिडीओ समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमुळे संतापलेले पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना कडक समज दिली आहे.

या नेत्यांच्या व्हिडिओमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना आमदारांमध्ये निर्माण झाल्यामुळे आमदार गायकवाड आणि मंत्र शिरसाटांना शिंदेंनी समज दिली आहे.

संघटनेला बदनाम करणारे, शिवसेनेची प्रतिमा मलिन करणारे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी समज त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिली आहे. त्यामुळे आता इथून पुढे हे नेते शिंदेंना आवडेल असं वर्तन करणार की आपली मनमानी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT